Share

Live Analytics

Comments 0

'दुर्गे दुर्घट भारी' आरतीची जन्मकथा,आई जगदंबेची कृपा आणि देवीसिंहाची अद्‌भुत लीला | Aniruddha Bapu Analytics Table

Income Estimates for 'दुर्गे दुर्घट भारी' आरतीची जन्मकथा,आई जगदंबेची कृपा आणि देवीसिंहाची अद्‌भुत लीला | Aniruddha Bapu

Based on this YouTube video's total view count of 41.1K views and industry-standard rates, the estimated total earning is $29 - $82 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About 'दुर्गे दुर्घट भारी' आरतीची जन्मकथा,आई जगदंबेची कृपा आणि देवीसिंहाची अद्‌भुत लीला | Aniruddha Bapu

Explore 'दुर्गे दुर्घट भारी' आरतीची जन्मकथा,आई जगदंबेची कृपा आणि देवीसिंहाची अद्‌भुत लीला | Aniruddha Bapu with 41,120 views, 1,174 likes, and 12 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

सध्या श्रद्धावानांच्या प्रिय आई जगदंबेचा उत्सव - ‘अशुभनाशिनी नवरात्री उत्सव’ (आश्विन नवरात्री उत्सव) भारतात सगळीकडे हर्षोल्लासात साजरा केला जात आहे. गुरुवार दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ हा सद्‌गुरु अनिरुद्ध बापूंच्या पितृवचनाचा दिवस ह्या नवरात्रीत आल्याने श्रद्धावानांच्या आनंदाला अधिकच उधाण आले होते व सर्वजण अत्यंत अधीरतेने सद्‌गुरु बापूंची व ‘बापू आज पितृवचनात काय सांगतात’ त्याची वाट पाहत होते. सद्‌गुरु बापूंनी पितृवचन सुरू करण्याअगोदर एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितली. बापूंनी औपचारिकपणे ‘सद्‌गुरु’ म्हणून त्यांचे कार्य १९९६ साली सुरू केले. संस्था स्थिरस्थावर झाल्यावर त्यांनी २००४ मध्ये कार्यानुसार संस्थेची व पदाधिकार्‍यांची पुनर्रचना केली होती. त्यानंतर गेल्या काही वर्षांत कार्याच्या अनुषंगाने त्यात अनेक नवनवीन गुणी लोक संस्थेशी जोडले गेले. गुरुवारी केलेल्या घोषणेअन्वये सद्‌गुरु बापूंनी संस्थेचे ‘डेप्युटी डीन’ म्हणून डॉ. पौरससिंह जोशी ह्यांची नियुक्ती केली. एम.डी. (जेरियाट्रिक्स) असलेल्या डॉ. पौरससिंहांनी गेली अनेक वर्षे, आपली डॉक्टरी प्रॅक्टिस सांभाळून बापूंच्या सामाजिक कार्यात, विशेषत: ‘अनिरुद्धाज् अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट’ (एएडीएम) च्या कार्यात ज्या समर्पित वृत्तीने स्वत:ला झोकून दिले आहे, ते श्रद्धावान कौतुकाने पाहातच आहेत. त्यामुळे ही घोषणा झाल्याबरोबर श्रद्धावानांमध्ये एकच आनंदाची लाट उसळली. अशा आनंदी वातावरणातच सद्‌गुरु बापूंनी आपले पितृवचन सुरू केले. सध्या चालू असलेल्या नवरात्रीच्या अनुषंगाने बापूंनी, एका सामान्यातून असामान्य बनलेल्या देवीभक्ताची कथा त्यात सांगितली. देवीमातेवर आणि तिचा पुत्र असणार्‍या देवीसिंहावर भक्ताचा नि:शंक व अनन्य विश्वास कसा असायला हवा, हे अधोरेखित करणारी ही कथा आहे. मुघलांनी भारतावर आक्रमण करून भारतावर कब्जा केल्यानंतर सुमारे १५० वर्षांनंतरचा ह्या गोष्टीचा कालखंड आहे. मुघलांनी सर्वत्र अत्याचार, धर्मांतर, जुलूम सुरू करून सगळीकडे हाहा:कार माजवायला सुरुवात केलेली होती. गावागावांत जाऊन मुघल सैनिक लुटालूट, अत्याचार, धर्मांतर, स्त्रियांना पळवून नेणे आदि प्रकारांनी लोकांमध्ये दहशत पसरवून आपले राज्य मजबूत करत होते. अशा वेळेस नाशिकजवळील एका गावाजवळ मुघल सैन्याचा डेरा पडला. ह्या लहानशा गावात ‘त्र्यंबकराम शास्त्री जोशी’ हे देवीभक्त राहत होते. गृहस्थाश्रमी असलेले त्र्यंबकरामशास्त्री प्रकांडपंडित होते. गावातील सर्वचजण श्रद्धावान असलेल्या ह्या गावात त्यांना खूप मान होता. ह्या त्र्यंबकरामांना एके दिवशी आई महिषासुरमर्दिनीचा दृष्टांत झाला व तिने त्यांना, त्यांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या संकटाची कल्पना दिली व त्यांना सर्व गावाचे नेतृत्व करून गावातील श्रद्धावानांना वाचवण्यास सांगितले. मुख्य म्हणजे ‘मी सदैव तुमच्या बरोबरच असेन’ असे त्यांना आश्वस्तही केले. त्र्यंबकरामांनी गावकर्‍यांना ह्या दृष्टांताबद्दल सांगून देवीची करुणा भाकली. पुढे कशा दैवी, चमत्कृतिजन्य घटना घडत जातात, देवीवाहन असणारा तो देवीसिंह त्यांना कसा मदत करतो व संकटातून बाहेर काढतो, हे ऐकताना त्या ‘प्रसन्नवदना’ देवीमातेच्या अपरंपार सामर्थ्यासमोर व भक्तांकरिता सतत विस्तारत जाणार्‍या तिच्या करुणेसमोर मन पुन्हा पुन्हा नतमस्तक होत राहते आणि आई जगदंबेच्या प्रेमाने ओतप्रोत भरून जाते. ह्या कथेच्या अनुषंगाने सद्‌गुरु बापूंनी ‘दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी। अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी’ ह्या देवीच्या प्रचलित आरतीची जन्मकथाही सांगितली व नवरात्रीत तरी रोज ही आरती करायला काधीही विसरू नका, असे कळकळीने सांगितले. ह्या पितृवचनात सद्‌गुरु बापूंनी श्रद्धावानांकडून - ‘जय जय जय धामेश्वरी पराम्बा परमेश्वरी सर्वलोक महेश्वरी पराम्बा परमेश्वरी’ व ‘अंबे तुझ्या पायाशी राहू दे गं आई माझी ईडपीडा टळू दे गं आई राजा उदे उदे आई राज्य उदे उदे उदे गं अंबे उदे’ आणि ‘आई उदे तुला आमची करुणा येऊ दे आई उदे आमची इडापीडा टळू दे आई उदे’  - हे गजर करून घेतले. #AniruddhaBapu #chandikadevi #navratristory ©℗ ---------------------------------- Join the WhatsApp Channel - https://whatsapp.com/channel/0029Vb9chCPKGGGLZITZyM3H For more information about Sadguru Shree Aniruddha (Bapu) - Aniruddha Devotion Sentience site - https://aniruddhabapu.in Samirsinh Dattopadhye blog - https://sadguruaniruddhabapu.com Know more about the Devotional Services carried out under the guidance of Sadguru Shree Aniruddha (Bapu) - http://www.aniruddhasadm.com https://aniruddha-aadeshpathak.com ---------------------------------- 0:00 अरिष्टाची चाहूल आणि आईची हाक 2:44 संस्थेची पुनर्रचना आणि नवीन जबाबदारी 5:27 जगदंबेचा जयघोष आणि भक्तीचा गजर 7:01 सर्व काही आईच्या कृपेवर अवलंबून 16:26 मुघल आक्रमणाची भयावह परिस्थिती 29:10 दुर्गे दुर्गट भारी आरतीचा उगम 38:58 सिंह जागृत झाला आणि संकट टळले

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard