

चुकीचे रामायण पाहून, ऐकून, वाचून आध्यात्मिक आरोग्य बिघडवू नका | Sadguru Aniruddha Bapu
54,187
Socialcounts.Org
2,235
likes
46
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
चुकीचे रामायण पाहून, ऐकून, वाचून आध्यात्मिक आरोग्य बिघडवू नका | Sadguru Aniruddha Bapu Analytics Table
Income Estimates for चुकीचे रामायण पाहून, ऐकून, वाचून आध्यात्मिक आरोग्य बिघडवू नका | Sadguru Aniruddha Bapu
Based on this YouTube video's total view count of 54.1K views and industry-standard rates, the estimated total earning is $38 - $108 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About चुकीचे रामायण पाहून, ऐकून, वाचून आध्यात्मिक आरोग्य बिघडवू नका | Sadguru Aniruddha Bapu
Explore चुकीचे रामायण पाहून, ऐकून, वाचून आध्यात्मिक आरोग्य बिघडवू नका | Sadguru Aniruddha Bapu with 54,187 views, 2,235 likes, and 46 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
आपल्या आजूबाजूच्या जगात रोजच्या अनेक गोष्टी आपण बघत असतो, अनुभवत असतो. तीच-तीच गोष्ट पुन्हा-पुन्हा बघून, अनुभवून आम्हाला ती अंगवळणी पडते, तिची ‘सवय’ होत जाते व मग हळूहळू आम्हाला त्या गोष्टीतील दोष, गोष्टीत झालेले फरक दिसेनासे होतात. गुरुवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी केलेल्या पितृवचनाची सुरुवात हाच धागा पकडून केली. इथे मुद्दा समजण्यासाठी त्यांनी काही महिन्यांच्या छोट्या बाळाच्या वाढीचे उदाहरण दिले. त्या बाळाला रोज पाहणार्या त्याच्या घरच्या माणसांना त्याची होत असलेली वाढ लक्षात येईलच असे नाही; मात्र त्याला काही महिन्यांनंतर पाहणार्या नातेवाईकांना त्या बाळाची वाढ चटकन लक्षात येते. हा मानवी स्वभावाचाच गुणधर्म असल्याने हे नैसर्गिकरित्या होत असते. पण अनेकदा, मानवी स्वभावाच्या ‘ह्या’ गुणधर्माचा ‘वापर’ आपमतलबी लोकांकडून आपल्या स्वार्थासाठी किंवा त्यांचा कुठलातरी कुटिल हेतू राबविण्यासाठी करून घेतला जातो. आपल्या कानांना/डोळ्यांना ‘सवय’ केली जाते चुकीच्या गोष्टी ऐकण्याची, चुकीच्या गोष्टी पाहण्याची. ह्याचे सगळ्यात मोठे उदाहरण म्हणजे विविध उत्पादनांच्या जाहिराती, असे इथे सद्गुरु बापूंनी सांगितले व ते कसे, हेदेखील दैनंदिन जीवनातील उदाहरणांच्या सहाय्याने समजावून सांगितले. आरोग्यासाठी घातक ठरणार्या पदार्थांना ‘पौष्टिक’ दाखवून आमचा जाहिरातींद्वारे बुद्धिभेद कसा केला जात आहे आणि आमच्या गळी ‘विष’ कसे उतरविले जात आहे, तेदेखील बापूंनी कळकळीने सांगितले व हा मुद्दा समजण्यासाठी त्यांनी, प्राचीन काळी प्रचलित असणार्या ‘विषकन्या’ ह्या प्रकाराचे उदाहरण दिले. सध्याच्या काळात लहान वयातच जडणारे अनेक रोग हे बदललेल्या जीवनशैलीचा व ह्या बदललेल्या आहारसंस्कृतीचाच परिणाम आहे, असे त्यांनी ठासून सांगितले व बापूंनीच २०१४ साली ‘अंधेरी स्पोर्टस् कॉम्प्लेक्स’मध्ये सादर केलेल्या, ‘Self-Health’ विषयावरील सेमिनारची आठवण करून दिली; ज्यामध्ये त्यांनी आधुनिक काळातील उचित आहार व जीवनशैलीबद्दल बहुमोल मार्गदर्शन केले होते. कुठलीही बाब घातक ठरू द्यायची नसेल, तर ‘मर्यादा’ आणि ‘सुवर्णमध्य’ हे दोन शब्द लक्षात ठेवलेच पाहिजेत, असे त्यांनी ठासून सांगितले. मुख्य म्हणजे, ‘आहार’ म्हणजे फक्त मुखावाटे घेतो तोच नव्हे; तर दृष्टीने, मनाने, बुद्धीने जे ग्रहण केले जाते, तोदेखील ‘आहार’च आहे, असे त्यांनी सांगितले. मनुष्यस्वभावातील उपरोक्त गुणधर्माचा ‘वापर’ करून, सध्याच्या काळात हे बाकीचे ‘आहार’ही कसे दूषित केले जात आहेत, हे सद्गुरु बापूंनी उदाहरणांच्या सहाय्याने समजावून सांगितले. वाईट गोष्टी चांगल्या गोष्टींपेक्षाही भव्य दाखवून, त्यातून आमचा बुद्धिभेद करून वाईट गोष्टींचे उदात्तीकरण कसे केले जात आहे हे उलगडून दाखवताना बापूंनी इथे गेली अनेक वर्षे चित्रपटांमधून हळूवारपणे - चुकीच्या गोष्टींचे उदात्तीकरण करून आमचा बुद्धिभेद कसा केला जात आहे, ते उदाहरणांसहित सांगितले व मुख्यत: सध्या सगळीकडे चर्चेत असलेल्या ‘रामायण’ सिनेमाचा दाखला दिला. भव्य, नेत्रदीपक स्पेशल इफेक्ट्स (व्हीएफएक्स) दाखवून, त्यात प्रेक्षकांना गुंगवून, त्याआडून मूळ कथानकात पाहिजे ते फेरफार करून आपल्याला हवा तो चुकीचा अजेंडा रेटायचा, असे प्रयत्न चालू आहेत ह्याकडे त्यांनी लक्ष वेधले. हे षडयंत्र ओळखा आणि स्वत:च्या देवाचा-धर्माचा अभिमान बाळगायला शिका, असे त्यांनी ह्या वेळेला कळकळीने सांगितले. ह्या अनुषंगाने सद्गुरु बापूंनी श्रद्धावानांकडून - ‘दत्तगुरुंच्या लेकरा, धाव पाव रे मला। अनिरुद्धा अनिरुद्धा, मी हाक घालितो तुला’ हे गार्हाणे गाऊन घेतले. #AniruddhaBapu, #HealtyDiet #SelfHealth ©℗ ---------------------------------- Join the WhatsApp Channel - https://whatsapp.com/channel/0029Vb9chCPKGGGLZITZyM3H For more information about Sadguru Shree Aniruddha (Bapu) - Aniruddha Devotion Sentience site - https://aniruddhabapu.in Samirsinh Dattopadhye blog - https://sadguruaniruddhabapu.com Know more about the Devotional Services carried out under the guidance of Sadguru Shree Aniruddha (Bapu) - http://www.aniruddhasadm.com https://aniruddhaseva-institution.com ----------------------------------
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard