4
likes
0
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
दूषित पाणी, तुंबलेल्या गटारी अन् कचऱ्याचे साम्राज्य; संतप्त ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीला अल्टिमेटम! Analytics Table
Income Estimates for दूषित पाणी, तुंबलेल्या गटारी अन् कचऱ्याचे साम्राज्य; संतप्त ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीला अल्टिमेटम!
Based on this YouTube video's total view count of 1.17K views and industry-standard rates, the estimated total earning is $1 - $2 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About दूषित पाणी, तुंबलेल्या गटारी अन् कचऱ्याचे साम्राज्य; संतप्त ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीला अल्टिमेटम!
Explore दूषित पाणी, तुंबलेल्या गटारी अन् कचऱ्याचे साम्राज्य; संतप्त ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीला अल्टिमेटम! with 1,171 views, 4 likes, and 0 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
दूषित पाणी, तुंबलेल्या गटारी अन् दुर्गंधीचा विळखा; शिरगुप्पी ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा ग्रामस्थांचा इशारा निपाणीजवळील शिरगुप्पी गावात पिण्याच्या पाण्यापासून स्वच्छतेपर्यंतच्या मूलभूत सुविधांचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दूषित पाणी, तुंबलेल्या गटारी, रस्त्यावरील कचऱ्याचे ढीग आणि गावाच्या मध्यभागी असलेल्या स्मशानभूमीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, तातडीने उपाययोजना न झाल्यास शिरगुप्पी ग्रामपंचायतीसमोर ठिय्या आंदोलन करून ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. गावातील चर्मकार, मातंग आणि बौद्ध समाजातील नागरिक पिण्यासाठी वापरत असलेली विहीर कोणत्याही संरक्षक कट्ट्याविना उघडी असल्याने गटारीतील सांडपाणी थेट विहिरीत मिसळत आहे. परिणामी विहिरीतील पाणी दूषित झाले असून नागरिकांना तेच पाणी पिण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. गावातील गटारी अनेक दिवसांपासून तुंबलेल्या अवस्थेत आहेत. सांडपाणी रस्त्यावर वाहत असून सर्वत्र अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरली आहे. ग्रामपंचायतीकडून गटारींची नियमित साफसफाई केली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्यालगत कचऱ्याचे ढीग साचल्याने डेंग्यू, मलेरिया आणि इतर संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला असून नागरिक भीतीच्या वातावरणात जीवन जगत आहेत. याशिवाय गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या स्मशानभूमीमुळे प्रेतदहनानंतर निर्माण होणारा धूर, राख आणि दुर्गंधी थेट नागरिकांच्या घरांपर्यंत पोहोचत असल्याने परिसरातील रहिवाशांचे जीवन असह्य झाले आहे. ही स्मशानभूमी तातडीने गावाबाहेर हलवावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामविकास अधिकारी (PDO) शिवानंद दयानंद तेली यांच्याकडे शिरगुप्पीसह दोन ग्रामपंचायतींचा अतिरिक्त कार्यभार असल्याने ते प्रामुख्याने कुन्नूर येथे व्यस्त असतात. त्यामुळे शिरगुप्पीत आठवड्यातून केवळ एक-दोन वेळाच भेट दिली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. गावातील गंभीर समस्यांकडे प्रशासनाकडून सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने पुढील मागण्या केल्या आहेत— दूषित विहिरीभोवती संरक्षक भिंत बांधावी, तुंबलेल्या गटारींची त्वरित साफसफाई करावी, दोन दिवसांतून एकदा कचरा उचलण्याची व्यवस्था करावी, गावात कचराकुंड्या बसवाव्यात आणि मध्यवर्ती स्मशानभूमी गावाबाहेर स्थलांतरित करावी. अन्यथा तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी दलित महासंघ बेळगाव जिल्हाध्यक्ष भरत रोड्डे, निपाणी तालुका अध्यक्ष दत्तात्रेय माने, मादर महासभेचे उपाध्यक्ष शंकर कांबळे, सामाजिक कार्यकर्ते दीपक केंगारे, उत्तम काळे, कृष्णात कोकरे, गणपती गस्ते, सागर महाजन, सुनील रोड्डे, विकास गस्ते, नामदेव कांबळे, यशवंत चव्हाण, चंद्रकांत गस्ते, संतोष महाजन, हिराबाई रोड्डे, महादेवी गाडीकर, सुशीला महाजन, आयेशा केंगारे, मंगल गस्ते, शारूबाई रोड्डे, प्रतिभा रोड्डे, स्वाती कोकरे, अरुणा कोकरे यांच्यासह मातंग, चर्मकार आणि बौद्ध समाजातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

